नवी दिल्ली- देशभरातील सुमारे 54,000 पेट्रोल पंप13 तारखेच्या मध्यरात्रीपासून एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. अधिक मार्जिनसह आपल्य अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अले हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आला असल्याची माहिती यूपीएफ (युनायटेड पेट्रोलियम फ्रंट) ने दिली आहे. पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी लागू करावा अशीही एक मागणी यूपीएफने केली आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स, द ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आणि कन्सोर्टियम इंडियन पेट्रोलियम डीलर्सच्या 54,000 पेट्रोल पंपांचे प्रतिनिधित्व यूपीएफ करते.
No comments:
Post a Comment