पिंपरी – महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी पदोन्नतीवरून थेट महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. प्रशासनावर आर्थिक देवाण-घेवाणीचे थेट आरोप केल्यामुळे त्याची तक्रार थेट केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचली. त्यामुळे महापालिकेची देशभरात बदनामी झाली. या कारणामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांचे औषध व साहित्य खरेदीचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी डॉ. रॉय यांना ही एक प्रकारची शिक्षाच दिली असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.
No comments:
Post a Comment