Thursday, 26 October 2017

रिक्षा – टॅक्‍सी प्रवास महागणार , तीनशे पानी अहवाल सादर

चौफेर न्यूज – रिक्षा-टॅक्‍सींच्या भाडेदराचे सूत्र ठरववण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीने आपला 300 पानी अहवाल नुकताच सरकारला सादर केला. मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्‍सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ करण्याची शिफारस तसेच ऍपआधारित टॅक्‍सी सेवांच्या चढ्या दरांवर अंकुश ठेवण्याची शिफारस या समितीने केली आहे. ऍप आधारित टॅक्‍सींसाठी चार ते पाच पटीच्या वाढीऐवजी दुप्पट भाडे वाढवण्याची शिफारसही समितीने केली आहे.

No comments:

Post a Comment