Tuesday, 31 October 2017

‘आयटी सिटी’ची कोंडी सुटणार!

हिंजवडीसाठी दोन पर्यायी रस्ते: आमदार जगताप यांची माहिती 
पिंपरी – वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील ‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या या भागातील कोंडी सोडवण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे 12 आणि 18 मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment