Tuesday, 31 October 2017

औंध येथील मुळा नदी काठी कचऱ्याचे ढीग; प्रशासनाला निवेदन

पिंपरी- औंध येथील मुळा नदीच्या पिंपरी महापालिका हद्दीतील काठावर मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचऱ्याचे ढिग लागले आहेत. याकडे ह-क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे नदीकाठी स्वच्छता करावी, अशी मागणी शिवशक्‍ती व्यायाम मंडळाने केली आहे. औंध येथील परिहार चौकातून श्रीमंत महादजी शिंदे पुलावरून पुढे आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द सुरू होते. हा पूल ओलांडल्यावर दोनही बाजूंना खोल नदीपात्र असून त्या ठिकाणी प्लास्टीक कचऱ्याचे ढीग साठले आहेत. नदीपात्रात घरातील भंगार व टाकाऊ वस्तूही टाकल्या आहेत. यामुळे मुळा नदीच्या नदी पात्रास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागानेही कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्या ठिकाणचा कचरा साफ करून मुळा नदीपात्र कचरामुक्‍त ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment