Thursday, 5 October 2017

शाळा एकत्रीकरणाचा विद्यार्थ्यांना फटका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 43 शाळा एकत्रीत केल्यामुळे दोन सत्रात चालणाऱ्या शाळा आता एका सत्रात सुरू झाल्या आहेत. त्याचा फटका शाळेतील विद्यार्थिनींना बसत आहे.
महापालिकेच्या 128 प्राथमिक शाळांपैकी 43 शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शिक्षण मंडळ प्रशासनाने घेतला. त्यानुसार काही शाळांचे एकत्रीकरणही झाले. त्यातील काही शाळांची पटसंख्या 500 पेक्षाही अधिक आहे. तरीही, अशा असंख्य शाळांचे एकत्रीकरण केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी दोन सत्रात चालणाऱ्या शाळा एकत्रीकरणामुळे आता एकाच सत्रात चालत आहेत. त्यामुळे दुपारी भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही वेळ अडचणीची ठरत असल्याची बाब मंडळातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. घरातील काम, लहा भावंडाचा सांभाळ, बाहेरील घरगुती कामे करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment