पिंपरी, प्रतिनिधी – पिंपरी येथील संत गाडगेमहाराज चौकात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. पिंपरी चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरे रस्तयाच्या मध्येच ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहनांना जाण्या-येण्यास मार्ग उरत नाही. अचानकच उठून धावायला लागणाऱ्या आणि एकमेकांसोबत झुंजणाऱ्या या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. कित्येकदा जनावरे नागरिकांच्या अंगावर ही धावून जातात, यामुळे नागरीक आणि वाहनचालकांना जीव मुठीत घेवून येथून जावे लागते.
या परिसरात त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या परिसरात त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment