पिंपरी - फरशी पुसणे, पाणी भरणे, झाडू मारणे, भिंती-छपराला रंग देण्याचे काम विद्यार्थी (प्राथमिक) करतात का, याचे उत्तर निश्चितच नाही, असेच आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या हिंजवडीतील शाळेत ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. याबाबत शिक्षिकांकडे विचारणा केली असता, जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडूनच करून घ्यावी लागत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
No comments:
Post a Comment