Monday, 13 November 2017

मोशीत फळभाज्यांची आवक पुर्वपदावर

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक 550 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 23 हजार 170 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 56 क्विंटलने वाढली; तर पालेभाज्यांची आवक 8 हजार 810 गड्डयांनी वाढली. गेली तीन आठवडे बाजारात फळभाज्यांची आवक मंदावली होती. आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत आहे. याशिवाय मंगळवारी असलेल्या कार्तिकी यात्रेनिमित्त बाजारात भुईमूग शेंगा व रताळ्याची आवक वाढली आहे.

No comments:

Post a Comment