आयोगाच्या नियमानांच फासला हरताळ , थकबाकीदार ग्राहकांना नोटीसाच नाही
पुणे – राज्य वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार वसूलीसाठी महिनाभर नोटीस देणे अपेक्षित आहे. मात्र, महावितरण प्रशासनाने न्यायालयाचा अधिकार असलेल्या आयोगाच्या आदेशालाच हरताळ फासत बेकायदा पठाणी वसूली सुरु करत तुटपुंजी थकबाकी असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ही बेकायदा आणि पठाणी वसूलीची मोहिम फत्ते होण्यासाठी चक्क मुख्य आणि प्रादेशिक कार्यालयाकडून कुमक पाठविण्यात आली आहे, या बेकायदा वसूलीला ” शून्य थकबाकी’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. मात्र, ही बेकायदा वसूली सर्वसामान्य ग्राहकांच्या मुळावर आली असून सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.
No comments:
Post a Comment