पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी भागातील रस्त्यातील खड्ड्यांत खडी मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या सहा प्रभागांतर्गंत येणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये ही कामे होणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 58 लाख 41 हजार 699 एवढा खर्च केला जात आहे. खड्डे बुजवण्याबरोबरच डांबरीकरणासाठी महापालिका लाखो रुपयांचा खर्च करत आहे. त्यामुळे डांबरकरणासारखे खर्चीक काम सोडले तर नागरिकांनी कर रुपात भरलेले 58 लाख रुपये खड्ड्यात जाणार आहेत.
No comments:
Post a Comment