पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात सत्तेचे दान टाकले. परंतु, त्यांना ते पेलवेनासे झाल्याचे चित्र आहे. अवघ्या सहा महिन्यातच भाजपवर भ्रष्टाचाराच्या आरोपाचे शिंतोडे उडाले. कचरा, पाणी, आरोग्य प्रश्नाचे तीन तेरा झाले आहेत. नगरसेवकांचा कोणाला कोणाचा पायपोस नाही. अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरु आहे. मागील दाराने वाढीव खर्चाच्या उपसूचनांचा भडीमार, विरोधकांची मुस्कटदाबी सुरुच आहे. मेट्रोच्या कामाला झालेली सुरुवात वगळता शहरासाठी लाभदायी असे एकही विकास काम अद्याप दृष्टीक्षेपात नाही. हा सारा कारभार पाहता कालचाच गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
No comments:
Post a Comment