पिंपरी - स्मार्ट सिटी असेल, की अमृत योजना सरकारने विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे ठरविले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१३ मध्ये ‘सारथी हेल्पलाइन’ सुरू केली. आज ही योजना सरकारी स्तरावर यशस्वी होत आहे. देशातील २१९ शहरांत ‘सारथी’ सुरू करण्यासंबंधी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नुकतेच सूचित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘सारथी नॉलेज सेंटर’ (एसकेसी) सुरू करण्याचे ठरविले असून, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
No comments:
Post a Comment