पुणे - प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, पिशव्या, कप अशा विविध प्रकारच्या वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करुन त्याच्यावर पुर्नप्रक्रिया केली जाते. यात प्लॅस्टिकचे मोठे-मोठे गठ्ठे बनवून ते इंदौर, मालेगाव अशा विविध ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांना पाठविला जातात. यापासून मजबूत आणि टिकाऊ पाईप बनविण्यात येतात. याप्रकारे शहरातून दररोज संकलित होणाऱ्या ६० टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, असे कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार ललित राठी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment