पिंपरी – बेकायदेशीरपणे चौकात, बाजारपेठेत अथवा महत्वाच्या गजबजलेल्या ठिकाणी वाढदिवस, खासगी कार्यक्रम, उपक्रम आणि व्यवसायीक जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात असताना महापालिकेतील आकाशचिन्ह परवाना विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, हे लज्जास्पद आहे. या विभागाचे सहायक आयुक्त याला जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच शहरातील बकालपणा वाढला आहे, अशा शब्दांत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर येत्या सोमवार (दि. 11) पर्यंत सरसकट अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले, अशी माहिती स्थायी सभापती सीमा सावळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment