पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी सारथी हेल्पलाईन, संकेतस्थळ, एसएमएस, मेल, लोकशाही दिन, मोबाईल अॅप, किऑक्स या माध्यमातून नागरिकांना तक्रारी करता येतात. त्यात आणखी भर पडली असून पालिकेने तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. त्यानुसार पालिकेने ९९२२५०१४५० हा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
हा व्हाॅचस् क्रमांक ९९२२५०१४५० दिल्याबद्दल धन्यवाद. मी आताच संत ज्ञानेश्वर बागेतील मूत्रालयात पाईप नसल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाची सचित्र माहिती पुरविली. मनपा त्.ावर तात्काळ उपाय करेल अशी आशा करू या. १७ १७:१०, ०४/११/२०१७.
ReplyDeleteएक सूचना (सजेशन) या वार्तापत्रावर मनपाच्या सर्व लिंकस एमब्येड करावेत. म्हणजे मनपाला सुद्धा कळविता येणे शक्य होईल.
ReplyDeleteकेंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, पुणे मेट्रो यांचे ईमेल आयडी त्यात नव्याने अंतर्भाव करण्यात आले म्हणजेच नागरिकांचे मत आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर व नव्याने अंतर्भाव केलेल्या केंद्रीय मंत्री, पुणे मेट्रो टीमच्या अधिकृत ईमेल आयडीवर थेट पोहचणार आहे. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना आवाहन - कृपया आपला आवाज गल्ली ते दिल्ली जास्तीजास्त संख्येने पोहचवा.
ReplyDelete