पवना धरणातून थेट बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी खरेदी केलेले लोखंडी पाईप रस्त्यावर पडून गंजत आहेत. गॅस कटरच्या साह्याने पाईप कापून त्याचे तुकडे करून चोरीचे प्रकार घडत आहेत. याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जलवाहिनीसाठी महापालिकेने आणलेले लोखंडी पाईप रस्त्यावर पडून आहेत. मुकाई चौक किवळे बस टर्मिनससमोरील रस्त्यावर हे पाईप पडून आहेत. लोखंडी पाईप गंजून गेले आहेत. लोखंडी पाईपवरील क्राँकीट काढून गॅस कटरच्या साह्याने पाईप कापून त्याचे तुकडे केले जातात आणि ते तुकडे चोरून गेले जात आहेत.
No comments:
Post a Comment