Thursday, 11 January 2018

रामनगर परिसरात सीसीटीव्ही बसवा; नगरसेविका मीनल यादव

पिंपरी – शहरातील रामनगर प्रभाग क्रमांक 14 मध्ये गेल्या दोन दिवसापासून काही टोळक्‍याकडून मध्यरात्री वाहनांसह घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरु आहे. या तोडफोडीमूळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत व घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रभागात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी केली. याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment