पुणे : केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेत निवड झालेल्या आणि दहा लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मिळकतकराची आकारणी 'सेल्फ ऍसेसमेंट' पद्धतीने लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मालकाने स्वसाक्षांकित खरेदीखतासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सादर केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यावर विश्वास ठेवून संबंधित मिळकतीची करआकारणी करावी, असे आदेश राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. तसे झाल्यास नवी मिळकत अथवा सदनिका खरेदी केल्यानंतर कर लावून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खेटे घालण्याची गरज राहणार नाही.
No comments:
Post a Comment