पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करुन भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपवाले ‘अँनाकोंडा’ असून पैसे गिळून टाकत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तसेच करदात्यांच्या पैशांची लुटमार कदापी सहन केली जाणार नाही. या निविदेमुळे महापालिका भिकारी बनणार आहे. त्यामुळे त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नाना काटे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment