पुणे - दुपारची वेळ... शिवाजीनगरचा गजबजलेला परिसर... शाळकरी मुलांसमोर सिगारेटचे झुरके ओढत थांबलेले तरुण... आणि सिगारेटमधून हवेत जाणाऱ्या धुराकडे कुतूहलाने पाहणारा शाळकरी मुलांचा घोळका.. असेच चित्र फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर शाळेच्या वेळेत दिसले. त्यामुळे लहान मुलांचे अन्नपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ एकाच ठिकाणी न विकण्याच्या आदेशाची नितांत गरज होती, हे लक्षात आले आणि त्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता प्रकर्षाने समोर आली आहे.
No comments:
Post a Comment