निगडी - शहरात अनेक ठिकाणी थुंकणारे दिसतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याने जंतुसंसर्ग आणि रोगराई पसरते, याचे भान नसते. कुचकामी कायदा अन् अंमलबजावणी यातून थुंकणाऱ्यांचे फावते. स्वयंशिस्तीचा अभाव आणि बेपर्वाई यांना आळा घालण्यासाठी कायदा करून भागणार नाही, तर सामाजिक जागृती आणि दबाव गट निर्माण होण्याची गरज आहे; अन्यथा सामाजिक स्वास्थ्यापुढे जटिल प्रश्न भविष्यात निर्माण होईल, हे नक्की.

No comments:
Post a Comment