Thursday, 8 February 2018

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांना स्थायीची मंजूरी

चौफेर न्यूज –  अमृत योजने अंतर्गत चिखली, पिंपळे निलख व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या २०९ किलोमिटर ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २०१८-२०१९ या वर्षासाठी करांचे व करेत्तर शुल्क निश्चित करण्यास अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस स्थायी समिती सभेत करण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे २५७ कोटी ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. शहरामध्ये ज्या मिळकतींना पाणी कनेक्शन नाही परंतु त्यांना स्वत्रंत कनेक्शन घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा लाईन टाकणेत आलेली असते. निर्धारित तरतूदीनुसार त्याकरिता पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत करामध्ये पाणीपट्टी कर आकारणी करता येईल. त्या अनुषंगाने सन २०१८-२०१९ पासून पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत कराचे बिलात त्यांचे कर योग्य मूल्याचे ५% दराने पाणीपट्टी कर लागू करणेबाबत प्रस्तावित केले आहे. सन २०१८-१९ या वर्षाकरिता महानगरपालिका करांचे दर आणि करेत्तर बाबीची फी/शुल्क निश्चित करण्याचा व खाजगी मराठी माध्यामांच्या शाळा इमारतींना मालमत्ता कर हा बीगरनिवासी दराचे ऐवजी निवासी दराने आकारणी करणेस तसेच करयोग्यमूल्य निश्चित करणेकामी जे अ,ब,क,ड विभाग करणेत आलेले आहेत त्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेकामी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी बैठकीत करण्यात आली.

No comments:

Post a Comment