पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) व अन्य संघटनांच्या वतीने मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने यासाठी तत्वतः मंजुरी दिली असली तरी देखील इतर सर्व स्तरांवरून या मागणीबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पीसीसीएफने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने कनेक्टिंग एनजीओ अंतर्गत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून लाक्षणिक उपोषणाचा इशारा पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या मागणीसाठी एकत्र आवाहन करण्यात आले.

No comments:
Post a Comment