जुनी सांगवी - प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी विक्रेते व नागरीकांनी करावी. तसेच पर्यावरण व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथील भाजी व्यवसाईक,दुकानदारांना केले. त्याला प्रतिसाद देत जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्यापासुन ही मोहिम कठोरपणे राबविण्यात भाजी विक्रेते सरसावले आहेत. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवर प्लँस्टीक बंदीचे फलक लावुन नागरीकांनी कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत जनजागृती सुरू केली आहे.
No comments:
Post a Comment