पुणे - केंद्र सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता पुणे मेट्रोसाठी 1322 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या विविध तरतुदींमधून आढळून आले आहे, तर नागपूर मेट्रोसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) दोन्ही मेट्रो प्रकल्पांसाठी गेल्या वर्षीपेक्षा 979 कोटी रुपयांची तरतूद वाढीव झाली आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment