चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. संरक्षण खात्याने या जागेची २५ कोटी ८१ लाख ५१ हजार २०० रुपये इतकी किंमत सांगितली असून या जागेच्या बदल्यात संरक्षण विभागाच्या जागेलगत पर्यायी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी, असे पत्र पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पाठविले. त्या संदर्भात महापालिका पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment