पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशा मागणीचे पत्र महापौर नितीन काळजे यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांना पाठविले. पत्रात काळजे यांनी म्हटले आहे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात प्रशस्त रस्ते आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जात नाही. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. शहरातील नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवर दुतर्फा अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. वाहनचालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. सध्या लग्नसराई असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टिने तातडीने उपाययोजना कराव्यात.
No comments:
Post a Comment