शहरातील मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेकडून येणार्या जागा महामेट्रोच्या ताब्यात आलेल्या आहेत. मात्र पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका क्रमांक 1 मधील खडकी ते रेंजहिल्स दरम्यानच्या जागा ताब्यात येणे बाकी आहे. या जागा लवकरात लवकर ताब्यात येऊन कामाला गती मिळावी यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या बरोबर महामेट्रोची नुकतीच बैठक पार पडली. याप्रसंगी भाजपचे खासदार अनिल शिरोळे आणि महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रम्हण्यम उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment