पीएमपीची प्रवासी संख्या गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच घटली आहे. गेल्या १७ दिवसांत तीन वेळा ९ लाखांच्या आत, तर ७ वेळा १० लाखांच्या आत प्रवासी संख्या पोचली आहे. अकरा- बारा लाखांवरील प्रवासी संख्या इतकी कशी घटू लागली आहे? एकीकडे शहरातील लोकसंख्या ३५ लाख अन् वाहनांची संख्या ३६ लाख झाली आहे. त्यात दुचाकी वाहनांचे प्रमाण वाढतेच आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरही शहरात तब्बल ६०० दुचाकींची अन् ३०० मोटारींची ‘आरटीओ’कडे नोंदणी झाली. खासगी वाहनांची संख्या वाढत आहे अन् पीएमपीची प्रवासी संख्या कमी होत आहे, असे विदारक चित्र शहरात दिसत आहे.
No comments:
Post a Comment