पिंपरी - मासुळकर कॉलनी येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या इमारतींची पुरती दुरवस्था झाली असून, दूषित पाणीपुरवठा अन् स्लॅब कोसळणे येथील रहिवाशांसाठी नित्याचेच झाले आहे. त्यामुळे रहिवासी भीतीच्या सावटाखालीच राहत आहेत. तर दुसरीकडे कित्येक वर्षांपासून शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासकीय कर्मचाऱ्याचे आरोग्य धोक्यात आल्याने जीवन असुरक्षित झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

No comments:
Post a Comment