पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पावसाळ्यात 60 हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. त्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यासाठी जीपीएस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक महासंघ, हाउसिंग सोसायट्या, सार्वजनिक मंडळांचा सहभाग घेण्यात येणार आहे, असा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सोमवारी (दि.25) झालेल्या सभेत घेण्यात आला.

No comments:
Post a Comment