Wednesday, 6 June 2018

विघटन न होणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांवर कारवाई होणार

प्रभारी विभागीय आयुक्त म्हैसेकर यांचे आदेश

राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पुणे विभागात विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिले आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन २३ जूननंतर संबंधित उत्पादकाकडून होत नसल्याबाबतची दक्षता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment