महापाैर निधी वळवण्यासाठी अधिकारी-ठेकेदारांचा आटपिटा
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी महापालिका शिक्षण मंडळातील पावसाळी साहित्य खरेदीसाठी सन 2018-19 अंदाजपत्रात शून्य तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे 15 जूनला शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थी पावसाळी साहित्यापासून वंचित राहू नयेत, याकरिता अधिकारी व ठेकेदारांच्या सांगण्यावरुन जनतेच्या आपत्कालीन व गरजेच्या विकास कामांसाठी असलेला महापाैर निधी वळवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळी साधने खरेदी करणा-या मुंबईतील ठेकेदाराच्या भल्यासाठी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शालेय साहित्य खरेदीसाठी वळवण्यात आला. परंतु, त्या विद्यार्थ्यांच्या खरेदीत अंदाजे सात ते दहा टक्के अधिकारी व पदाधिका-यांसाठी रक्कम खर्ची घालण्यात आल्याने टक्केवारीचा वाद नव्याने उफाळणार अाहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य दर्जेदार मिळणार का ? याबाबत शंका उपस्थित होवू लागली आहे.

No comments:
Post a Comment