पिंपरी - शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या विचारात घेऊन पार्किंग धोरणही ठरवावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर युरोपातील शहरांसह देशातील मुंबई, रांची, बंगळूर, चेन्नई, नागपूर, पुणे या शहरांचा अभ्यास करून महापालिकेने पिंपरी-चिंचवडसाठी पार्किंग धोरण आखले आहे. त्याचे सादरीकरण दोन दिवसांपूर्वी महापालिका भवनात सहशहर अभियंता राजन पाटील यांनी केले होते. हे धोरण मान्य करण्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर बुधवारी (ता. २०) प्रशासनाकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. शहरासाठी निश्चित केलेले पार्किंगचे दर अन्य शहरांच्या तुलनेने कमी राहणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

No comments:
Post a Comment