Monday, 16 July 2018

मिनी मॅरेथॉनमध्ये अधिकार्‍यांसह धावले 172 जण

जनजागृतीसाठी राबविला उपक्रम
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये मतदार नावनोंदणी उपक्रम होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी, मतदारांना आपले नाव नोंदणी करावी याबाबत जनजागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 305, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्यावतीने आज (शनिवारी) मतदान नोंदणी अभियानांतर्गत पुनावळे ते थेरगाव दरम्यान आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपजिल्हा निवडणूक अधिकार्‍यांसह 172 जण या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले.

No comments:

Post a Comment