अकरावी- बारावीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा दहापट अधिक शुल्काची आकारणी महाविद्यालयाकंडून करण्यात येत आहे. महाविद्यालयाकंडून आकारण्यात येणार्या शुल्कावर कोणत्याच प्रकारचे बंधन राहिलेले नाही. शहरातील प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क वेगळे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी आणि शुल्कामध्ये एकसमानता आणण्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ शुल्क निश्चित करावे, अशी मागणी शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)च्या संचालिका वैशाली बाफना यांनी सरकारकडे केली आहे.
No comments:
Post a Comment