पिंपरी – महापालिकेला साहित्य पुरवठा करणाऱ्या तीन वेगवेगळ्या पुरवठादार संस्थांच्या दरपत्रकावर एकच मोबाईल क्रमांक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठादारांची ही रिंग उघडकीस आल्याने तीनही पुरवठादार संस्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या तीन संस्थांकडून कोणत्याही खरेदीसाठी दरपत्रके मागवू नयेत. तसेच त्यांची दरपत्रके ग्राह्य धरू नयेत, असे आदेश सर्व विभागांना दिले आहेत.

No comments:
Post a Comment