पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणार्या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. याकडे पालिकेचा निष्क्रिय पर्यावरण विभाग गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. या नदीच्या प्रदुषणाबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment