Wednesday, 4 July 2018

पर्यावरणासाठी महिलांनी शिवल्या कापडी पिशव्या

पिंपळे-गुरव – प्लास्टिक कॅरी बॅग बंदीला पर्याय म्हणून बालाजी महिला प्रतिष्ठानने सांगवी येथे मारुती मंदिरात दोन दिवस कापडी पिशव्या बनवणे मोफत प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणात महिलांनी उस्फूर्त भाग घेतला. उद्‌घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बालाजी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनुश्री ढोरे, प्रशिक्षिका शोभा चव्हाण, अपर्णा सोनवणे, पुष्पा गोसावी उपस्थित होते. घरातील वापरात नसणाऱ्या रंगीबेरंगी बेडशीट, साड्या, टॉप, पॅन्ट व शर्ट पीस आदी कापडांपासून साध्या व सोप्या पद्धतीने कापडी पिशव्या बनवण्यात महिला मग्न झाल्या होत्या. कात्री, टेप, सुई दोऱ्याने हात शिलाई करून तयार झालेली सुंदर कापडी पिशवी पाहून महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. भाजी बॅग, समोसा बॅग, वन साईड बॅग, डमरू बॅग, शॉपी बॅग आदी पिशव्या बनवण्याचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. “प्लॅस्टिक बंदीवर करू या मात.. टाकाऊ पासून टिकाऊ पिशव्या बनवून निसर्गाला देवू या साथ.’ असा संदेश यावेळी देण्यात आला.

No comments:

Post a Comment