पिंपरी – स्वारगेट ते पिंपरी अशी पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत जाण्याची शक्यता दाट आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रोचे काम चिंचवडपर्यंत होणार असल्याने पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. मेट्रो निगडीपर्यंत जावी, यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होत होते. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन देखील मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी अनुकूल असल्याचे दिसते.

No comments:
Post a Comment