चिंचवड – एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोडमधून साडे तीन हजार नागरिकांची घरे वाचवण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनास 400 दिवस पूर्ण झाले आहेत. अद्यापही या विषयावर कायम स्वरूपी तोडगा निघालेला नाही. घरे वाचवण्यासाठी भविष्यात कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडे नगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे-गुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करत आहेत. संघर्षास 400 दिवस पूर्ण झाल्यामुळे कासारवाडी येथे घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment