कामगारनगरीतून
निशा पिसे
——–
कामगार हा पिंपरी-चिंचवड कामगारनगरीचा कणा. मात्र, राज्यकर्त्यांच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे हा कणा डळमळीत झाला असतानाच केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदलाचा घाट घालून कामगार उद्धवस्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. कायम कामगार ही संकल्पना धोक्यात असताना आता कंत्राटी कामगार ही संकल्पना देखील मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोजगार निर्मितीच्या नावाखाली प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून श्रमिकांना राबवून घेण्याची खेळी कामगार कायद्यातील बदलामध्ये करण्यात आली आहे. कामगार या संकल्पनेवर घाला घालणारे हे बदल पाहता कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ कामगार वर्गावर आली आहे.

No comments:
Post a Comment