Sunday, 22 July 2018

रस्ते खोदाई पडणार महागात

पिंपरी  शहरातील रस्ते खोदाईबाबत पिंपरी- चिंचवड महापालिकेने धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार खोदाईसाठी पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विनापरवाना किंवा परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, अनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. महापालिकेच्या आज (शुक्रवारी) झालेल्या सभेमध्ये जोरदार खल झाल्यानंतर या धोरणास मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment