Monday, 27 August 2018

इतके का आमच्या शहरात सुविधांचे उणे!

केंद्र सरकारने राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली. या यादीत शहर 69 व्या क्रमांकावर गेले. यास  पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपने हात झटकले.  तर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपची सत्ता आल्यानंतर बेस्ट सिटीची वेस्ट सिटी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. सेेेनेेेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरातील गुंडगिरी, नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार पाहता राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा खालून पहिला नंबर यायला हवा होता,  अशी तिखट प्रतिक्रिया दिली. मात्र पीछेहाट होण्याइतके का या शहरात सुविधांचे उणे आहे? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.महासाधू मोरया गोसावी यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या  पिंपरी-  चिंचवडने स्वातंत्र्य चळवळीत  महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

No comments:

Post a Comment