सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने
पिंपरी : पिंपरी ते निगडी आणि नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर मेट्रो धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. या दोन्ही मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. हा अहवाल सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. दिल्लीतील सिस्ट्राईकॉम-इजिस-राईटस या संस्थेने हा डीपीआर तयार केला आहे. पहिल्या टप्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार होती. परंतु, मेट्रोचे काम वाढले असून एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंत गेले आहे. पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत सुरु करण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी केली होती. त्यासाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर पालिकेने मेट्रोला निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नाशिकफाटा ते चाकण या मार्गावरदेखील मेट्रोे प्रकल्पाचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने मेट्रोला या दोन्ही मार्गावरील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी पुणे महामेट्रोला तब्बल 4 कोटी 31 लाख रूपये पिंपरी पालिकेने दिले होते.
No comments:
Post a Comment