Monday, 27 August 2018

गणेशोत्सवानिमित्त वल्लभनगरमधून जादा गाड्या

कोकणात जाणार्‍या प्रवाशांची
पिंपरी : गौरी-गणपती सणाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातर्फे या वर्षीही 58 जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे. चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड, रत्नागिरी, गुहागरसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या वल्लभनगर आगारातून सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती वल्लभनगर आगाराचे व्यवस्थापक एस.एन.भोसले यांनी दिली. उद्योगनगरीच्या पिंपरी, ककाळेवाडी, आकुर्डी, निगडी, भोसरी भागात कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. दरवर्षी गणपतीला ते आवर्जून गावी जातात. गणेशोत्सवास यावर्षी 13 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे; तर गणपती प्रतिष्ठापना झाल्यानंतर तीन दिवसांनी गौरींचेही आगमन होत असते. त्यासाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीच्या पिंपरी-चिंचवड आगारातून करण्यात आले आहे. आगारातून दरवर्षी 50 टक्के गाड्या या कोकण विभागासाठीच सोडल्या जातात. मात्र, गौरी-गणेशोत्सवात या गाड्यासुद्धा प्रवाशांना कमी पडतात. त्यामुळे यंदा सोडण्यात येणार्‍या जादा गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment