Tuesday, 14 August 2018

स्मार्ट सिटीचे निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना

पालिकेच्या मालमत्तांचा वापर करण्याचे सर्वाधिकार मिळणार
महासभेमध्ये होणार शिक्कामोर्तब
पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामे करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, चौक, शाळा, इमारतींसह इतर मालमत्तांचा वापर करण्यास देण्याचे सर्वाधिकार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावावर 20 ऑगस्ट रोजी होणार्‍या महासभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यानंतर 9 जानेवारी 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीची स्थापना करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस दर्जाचा अधिकारी अथवा त्यातील तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू आहे. तोपर्यंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे

No comments:

Post a Comment