पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणे रस्ते, चौक, विद्युत डी. पी. बॉक्स, उड्डाण पुलाचे खांब, बस थांबे, विद्युत दिव्यांचे खांब, आदी ठिकाणी हॅंन्ड बील्स, भित्ती पत्रके लावून अनेकांकडून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी अशा व्यक्तींकडून महापालिका प्रति चौरस मीटर 750 रुपये दंड आकारून गुन्हेही दाखल करण्यात येणार आहे. अशा प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)
No comments:
Post a Comment