पिंपरी – एस. टी. महामंडळाच्या वल्लभनगर येथील आगारात शनिवारी (दि. 25) एका मद्यपी प्रवाशाने वाहतूक नियंत्रकास शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. यानंतर त्याने आगारात गोंधळ घातला. पोलिसांना हा प्रकार कळवूनही एकही पोलीस कर्मचारी याठिकाणी नाही. त्यामुळे आगाराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

No comments:
Post a Comment